रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

आज माझ्या वेदनेला काय झाले

आज माझ्या वेदनेला काय झाले?
भेटली होती, तरी ना हाल झाले !

चोख होती व्यवस्था स्वागताची  
कां तरी मैफलीत ना नांव झाले ? ...

शब्द पेले, अर्थवाही होती सुराही 
वाहवाही लुटविण्या व्यापार झाले ...

चांदवेडी रात झाली बघ दिवाणी 
काजव्यांचे ओरखाडे शृंगार झाले ... 

ह्या किनारी दाटतो अंधार आहे 
उतरले पाण्यात जे, ते पार झाले... 

- श्रीधर जहागिरदार 
३-११-२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा