गाणे गावे कोणा साठी?
जो तो धावे मोहा पाठी ...
ज्याच्या पाया स्पर्शू जावे,
तोची माथी घाली लाठी...
कोडी माझी घालू कोणा,
ज्याची त्याची बुद्धी नाठी...
खांदा देता उडती पिल्ले,
म्हाताऱ्याला नाही काठी...
ओठांचे ओठांशी नाते
जिव्हारी त्या पक्क्या गाठी ...
कैसी भागे तृष्णा माझी
पाण्या माजी उष्मा माठी....
- श्रीधर जहागिरदार
१३.०२.२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा