१.
नुकतीच फुटली पालवी!
फांदी फांदी वृक्षाची,
शहारली......
हिरवाकंच नेसून शालू,
आकाशमिठीत
सुखावली !!
२.
बेभान झालाय वारा!
थरथरले, नितळ निळे
जलाशयाचे अंग....
आवेग अनावर,
उठती, एकामागे
एक तरंग !!
३.
कोसळताहेत धारा!
युगायुगाची तृषार्त
ही माती सावळी,
मृदगंधाचे रांजण
उलथून, निपचित
सचैल पडली!!
४.
पसरले ऊन निवांत!
फुलें रेशमीं बटात
हिरव्या, पडली गुंतून,
तृप्त पहाटे,वृक्ष उभा ,
काठावर ...
ओथंबून!!
- श्रीधर जहागिरदार
९.०३.२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा