न सुटलेल्या समीकरणागत
सलते, छळते, पहिले प्रेम,
किती असु दे किंमत 'क्ष' ची,
मिळते-जुळते दुसरे प्रेम!
मोर पिसागत हळुवारसे
गळून पडते पहिले प्रेम,
शून्यातून जग उभे कराया
पुरून उरते दुसरे प्रेम!
अस्तित्वाचे भान, दिलासा
जगण्यासाठी, पहिले प्रेम,
अर्थ कळावा ह्या जगण्याचा
असा खुलासा दुसरे प्रेम!
- श्रीधर जहागिरदार
२ आगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा