1
मुखवट्याच्या बाजारातचेहरा आता वटत नाही,
माल एकदम अस्सल आहें
सांगितले तरी पटत नाही.
2.
मुखवट्याच्या बाहेर
लढत असतो जगाशी,
मुखवट्याच्या आत
झटत असतो स्वत:शी !
3.
लढत असतो जगाशी,
मुखवट्याच्या आत
झटत असतो स्वत:शी !
3.
चेहरा? शाबूत आहें.
मुखवटा? काबूत आहें.
बेधडक घे उडी तू,
इरादा मजबूत आहें.
मुखवटा? काबूत आहें.
बेधडक घे उडी तू,
इरादा मजबूत आहें.
4.
चेहरा रुजला कधी ना,
मुखवटा सजला कधी ना,
आयुष्य वैराण झाले
शिंपले त्याला कधी ना ...
5.
"चेहरा हिरमुसला कशाने
आज हा कां दुखवटा?"
"ओरबाडून गेले कुणी
आज त्याचा मुखवटा..."
6,
घामाने डबडबला
चेहरा गुदमरलेला,
रुमाल काढून मात्र
मुखवटाच पुसलेला...
7,
असे कसे बीज, देवा
करू कसे कवतिक
दाखवायला दुखवटा,
बाजारातून आणलाय
एक तयार मुखवटा ..
पेरला चेहरा, हाती
मुखवट्याचे पीक.
8.
दहा दिवस शोक पाळायचा
तर हवाच मुखवटा,
खरा चेहरा दिसला तर
कसा समजेल दुखवटा
9.
इतक्या वर्षांनंतर आता
दिसला एक खवटा,
तुमचाही नव्हताच चेहरा,
होता एक मुखवटा!
10.
सहज जमते आता दाखवायला दुखवटा,
बाजारातून आणलाय
एक तयार मुखवटा ..
11.
भाळलीस मुखवट्यावर
हा आहें तुझा दोष,
आता का मग असतो
माझ्या चेहऱ्यावर रोष?
12.
12.
देश किती धुंडाळले,पाहिली गावे किती,
माणसांची रूपे अनेक,वेगळ्या चालीरिती,
चेहरे दिसलेच नाही, मी मुखवटे पाहिले,
नाटक्यांच्या प्रदेशी, जगणेच बाकी राहिले.....
- श्रीधर जहागिरदार 'आरोळी'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा