शोध माझ्या फुला तू, गंध प्रीतीतला ...
प्रीत फुलली मनी हे कां कळेना तुला....
लाजते ... बोलते ... बोलता लाजते. ...
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना तुला....
तू मनी कोंदणी, हरघडी हर क्षणी,
वाट पाही, शिणे, बघ इथे पापणी....
बावरे, सावरे, भेटता तू मला.
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना तुला....
आज रे हासला बघ कसा मोगरा
सांगतो गुज तुला, गंध त्याचा खुळा,
माळ ना, साजणा, साद देतो तुला
प्रीत फुलली मनी हे, कां कळेना तुला....
- श्रीधर जहागिरदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा