कविता - एक शब्दखेळ
मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
गुरुवार, १९ जुलै, २०१२
शब्दखेळ
वचन देतो जीवना,
देणार मी जीव ना !
एक छोटी कामना,
छंद लाभो, काम ना!
सच्चीच होती भावना,
तू
दिला कां भाव ना?
जीवनी बहु यातना,
सापडे
सुख यात ना!
कैशी सुटावी वासना?
सर्वत्र तिचा वास ना !!
भार वाटे वेदना,
जाणिले मी वेद ना!
पुरती मला कल्पना
आता पुढे कल्प ना !!!
- श्रीधर जहागिरदार
१७ जुलै २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा