सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

चाहूल



टाळून आज गेला, ते माझेच दार होते,
दोस्तीत वागणे हे, नाही का फार होते!

लागताच चाहूल, मैफिल जमून आली,
ती रात्र पेलण्याला, पेले तयार होते!

जो तो उतावळा, बघण्यास उत्सवाला,  
आलीच वेळ जर का, खांदे ही चार होते!

जोरात फोडलेले, आधीच त्यांनी टाहो, 
चुपचाप झेलले मी, ज्यांचे प्रहार होते!

गेलास तू निघून, मारून फक्त थाप,
फावलेच त्यांचे, जे आधीच ठार होते!


शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

आयुष्य सोसताना



रंगून फूल जाते काट्यास तोलताना,
गाणे फुलून येते आयुष्य सोसताना...

उद्वेग हा मनाचा, घनघोर शब्द होता
जपतेस शब्द ओला, नात्यास बांधताना ...

होता शिकस्त माझी देतेस तू दिलासा
आश्वस्त मृदूलतेला केसांत पेरताना...

हतबल हताशतेचा, भिड़ता मनास अर्थ
स्मरतेस प्रार्थनेला, सांज्योत लावताना ...

पेटून मत्सराने, नाती अबोल होता
मातीस साद देशी, तुळशीस पूजताना

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

येईल एक होडी



आता आठवणींचे खण उघडायला मिळते सवड!

सापडतात सांदी कोपऱ्यात दडलेल्या काही खुणा, 
जुने फोटो, काही पत्र, धुळीने माखलेला मौउथ ऑर्गन..
आणि एक विस्कटलेली वही कवितांची....
प्रत्येक वस्तूभोवती गुंता पागल भावनांचा, आणि 
इतिहास घडल्या, बिघडल्या आणि अवघडल्या क्षणांचा
झरझर सरकतो डोळ्यांपुढून.
व्यवहार दक्ष, कर्तव्य दक्ष, सामाजिक प्रतिमा दक्ष.
दक्ष, दक्ष, दक्ष.. कौटुंबिक सुरक्षा हेच लक्ष्य!
कसा गेला त्या नंतरचा काळ, कळलेच नाही..

आता जो तो आपल्यात दंग, अन मी
पाण्यात पाय सोडून बसलेला,
ऐल तीरावरच्या आठवणी चघळत,
पैल तीर न्याहाळत.
येईल एक होडी अलगद 
माझ्या नावाचे शीड फडकावत 
नावाडी नसलेली. 
तोवर, असू दे, शब्दांचे हे तुकडे हाताशी,
जाईल वेळ बरा, 
कलिडिओस्कोप मध्ये टाकल्यावर ..

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

देखता हूँ मुड़कर मै जब


देखता हूँ मुड़कर मैं जब, लगता नहीं यह फासला,
कर लिया पार मैंने, दो दशक का सिलसिला।

इस दौड़ में कई मोड़ थे, हर मोड़ पर था काफिला,
शामिल हुआ मैं जहाँ, हर शख्स था काबिल मिला. 


दहशत भरी थी जब हवा, मैं जमींपर ही चला,
हाथ बढ़ता, साथ देता हर जगह इन्सान मिला. 



होड़ है जीनेकी बाहर, जीनेकी मगर   फुर्सत नही,
एक पल थमकर यहाँ, जीनेका था मक्सद मिला. 

हसरत थी, मैं फूल बन, महकू किसी बाग़ में,
अदनासा ख्वाब मेरा, आकर यहाँ हाँसिल मिला.

--- श्रीधर जहागिरदार

(Standard Chartered Bank से जून २०१० मे सेवा निवृत्तीपर रचित मेरे मनोभावो को उजागर करती रचना )

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

जनम दिन

तीन सौ चोंसठ दिन भाग दौड़ के...
दाये-बांये, आगे-पीछे, ऊपर-नीचे,
लगातार मची जानलेवा होड़ के...

हर कोई नचा रहा है ..
और नाच रहा है हर कोई,
हर तरह, हर जगह
घर पर, दफ्तरमें, सड़क पर...

"ये दो! वो लाओ!"
"अब तक क्यों नहीं हुआ?"
"ये ठीक नहीं, चेंज करो,
कल सुबह तक मेल करो!"
"गाड़ी आगे लो, जरा पीछे लो,
ठीक से चला नहीं सकते?"
"आप का लोन डिफ़ॉल्ट में है,
टैक्स का केस कोर्ट मे है"

साल में तीन सौ चोंसठ दिन
होते है, भीड़ साथ होते हुए
अकेलापन समेटे हुए....

साल में होता है एक और दिन
तीन सौ पैसठवा ...
खुशनुमा सुबह, चहचहाते पंछी,
घर के दरवाजे पर दस्तक देता
महकते फुलोंका गुलदस्ता
" डार्लिंग विथ लव"
फ्रिज पर रक्खा हाथसे बना
"हैप्पी बर्थ डे" कार्ड
दफ्तर में मुस्कराते चेहेरे
गाते गुनगुनाते
अपनी पसंद का केक
चेहरेपर मलते यार-दोस्त
इन बॉक्स में रंगबिरंगे मेल...

यही होता है वह दिन
अपने होने को सार्थक करता
तीन सौ चौसठ दिन की भागमभागमें
जीवन के सरगम सुनाता
बेतहाशा भीड़ में हमदम तलाशता
साल भर आपाधापी में मकसद तराशता!

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

आधार


हे आकाशा,
तू अस्पर्श आहेस पण म्हणून अमान्य नाहीस मला,
तुझ्या अस्तित्वाच्या ठळक खुणा जाणवतात सतत मला!
हा सूर्य, काय आधार आहे त्याला तुझ्या शिवाय?
आणि कुठे वसला असता चंद्रही, नसतास तू जर?
चांदण्याचे मखर तरी सजले असते कां तुझ्याविना?

हे निलेशा,
तुझंच वेड भरते उमेद त्या पक्ष्यांच्या पंखांत
आणि मोजतात ते भरारी आपली तुझ्याच उंचीने
पहिली झेप आणि ओढ त्या पिलांना तुझीच असते
आणि हे वृक्ष, रसरसलेले आनंद फुलांनी,
आळवतात हिरव्या गीताचे सूर,
उंचावून सारे हात तुझ्याच दिशेला...

रे,
तू आहेस म्हणूनच नव्या कल्पनांना निवारा आहे,
धाडस होते, नव्या दिशा धुंडाळण्याचे ,
वाटा हुकल्या, दिशा चुकल्या तरी तुझी निळाई
पाझरतच असते तशीच, पूर्वीसारखी....

अरे,
तू निकेतन आहेस साऱ्या अनिकेतांचे!
आपले रौरव, आपली धग, आपला दाह हरवून
रक्तलांच्छित झालेला, थकला भागला, क्लांत सूर्य
तूच उचलतोस त्या क्षितिजापाशी आणि
नवी उमेद, नवा उत्साह भरून पुन्हा
उतरवतोस प्राची वरच्या रिंगणात...

रे,
आपल्या चांदणी स्वप्नांचे पूर्णत्व मिरवणाऱ्या
पौर्णिमेचे कौतुक तूच दाखवतोस साऱ्या जगाला
त्या चंद्राच्या गवाक्षातून......
आणि उध्वस्त स्वप्नांनी काळवंडलेल्या निशिकांतास
आपल्या कुशीत घेऊन समजूतही घालतोस तूच!

सर्वव्यापी,
तू मुक्तद्वार आहेस लडिवाळाचे ...
हे किरमिजी, काळे, सावळे अन पांढुरकेही ढग
घालत असतात मुक्त धिंगाणा तुझ्या अंगणात..
असे दालनच नाही तुझ्या मनाचे एकही जिथे
ते डोकावू शकत नाहीत; किंबहुना तुझ्या मनाचा कापूसवाळा
मऊशारपणा तू त्यांच्यासाठी उधळून लावतोस ....