रंगून फूल जाते काट्यास तोलताना,
गाणे फुलून येते आयुष्य सोसताना...
उद्वेग हा मनाचा, घनघोर शब्द होता
जपतेस शब्द ओला, नात्यास बांधताना ...
आश्वस्त मृदूलतेला केसांत पेरताना...
हतबल हताशतेचा, भिड़ता मनास अर्थ
स्मरतेस प्रार्थनेला, सांज्योत लावताना ...
पेटून मत्सराने, नाती अबोल होता
मातीस साद देशी, तुळशीस पूजताना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा