टाळून आज गेला, ते माझेच दार होते,
दोस्तीत वागणे हे, नाही का फार होते!
लागताच चाहूल, मैफिल जमून आली,
ती रात्र पेलण्याला, पेले तयार होते!
जो तो उतावळा, बघण्यास उत्सवाला,
आलीच वेळ जर का, खांदे ही चार होते!
जोरात फोडलेले, आधीच त्यांनी टाहो,
चुपचाप झेलले मी, ज्यांचे प्रहार होते!
गेलास तू निघून, मारून फक्त थाप,
फावलेच त्यांचे, जे आधीच ठार होते!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा