यात्रेत रंगलो मी, घेऊन टाळ हाती,
माझाच देव करती काढून पालखी रे!
ज्ञानी म्हणून फार ते नावाजती जगात,
येता परि घराला, कळतेच लायकी रे!
"बोला सदा खरेच ", हे सांगतात संत,
ऐकून सत्य येथे फुटतात टाळकी रे!
शब्दांस मोकळीक आहे इथे मिळाली,
अर्थावरी परंतु त्यांचीच मालकी रे!
विश्वास ठेवण्याला तत्पर सदाच सर्व,
प्रेमास मात्र नाही उरलाच पारखी रे!
जत्रेत नाचला 'श्री' फासून रंग तोंडी,
आहे कसा कळावा, भलताच बेरकी रे!
सुंदर! बेहद्द आवडली.
उत्तर द्याहटवा>>ज्ञानी म्हणून फार ते नावाजती जगात,
येता परि घराला, कळतेच लायकी रे! <<
हे फार छान सुचलं आहे तुम्हाला
धन्यवाद कांचनजी !
उत्तर द्याहटवा