तर कशासाठी जपल्या श्वासांच्या खुणा,
मी एकटाच नव्हतो त्या वळणावर अनिवार
तू ही शामिल त्या जल्लोषात पुन्हा पुन्हा .....
बिन नाळेचाच जन्मलोय मी,
तुझ्यामागे नियमांचे धागे अनंत,
उजाड माळावर आणखीनच उजाड झालोय,
याची तुला कशाला मलाच खंत!
सावली सुद्धा निघून जाते संधी साधून
जेव्हा दाटून येते भयाण रात्र काळी,
भर दुपारी तापत्या उन्हात सावली हरवून
भूताड व्हायचं तेवढ फक्त माझ्या भाळी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा