वळणावरल्या गुलमोहरा,
तू असा हुरहुरु नको,
ओसरले जरी गीत फुलांतील आज परंतु झुरू नको...
नियमाने जे तुला भेटले,
ते क्षितिज जरी आज पेटले,आस तयाची धरू नको, तू असा हुरहुरु नको......
आकाशाने जरी ताडले,
पर्जन्याचे आसूड ओढले,
तुला सांगतो, डरु नको, तू असा हुरहुरु नको......
सूर घेउनी पक्षी उडाले,
दूर तमातच शब्द बुडाले,
मौनात असा गुदमरू नको, तू असा हुरहुरु नको......
संग सुटला जुना परिचीत,
रंग उडाले सारे अवचित,
फिरून त्यांना वरु नको, तू असा हुरहुरु नको......
गंध अगतिक करी याचना,
शपथ प्रीतीची मागे दाना,
रिती ओंजळी भरू नको, तू असा हुरहुरु नको......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा