होईल अपुला ऋतू साजरा...
प्राजक्ताने भरेल ओंजळ,
देहावरती निर्मळ दरवळ ...
कानावरती धम्म ग चाफा
कानशीलाशी फुटतील वाफा ...
शेवंतीचा डौल रांगडा
धमनी मधुनी घडा चौघडा...
बकुळीचा मोहातूर गंध
सैरभैर मन, नुरेल बंध....
चिमटी मधुनी सुटेल अलगद ...
उठेल पेटून मग ही शेज
उदंड ज्वाला, केशर तेज ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा