कविता - एक शब्दखेळ
मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
रविवार, १५ जुलै, २०१२
नव्हतो कधी आश्वस्त मी
असलो जरी ना ध्वस्त मी
नव्हतो कधी आश्वस्त मी !
धरतो
तुला
गृहीत, की
करतो बहाणा,"व्यस्त मी".
खचल्या व्यथा माझ्या मनी
म्हणुनीच राही मस्त मी!
पळवून नेले दु:ख तू
असतो सुखाने त्रस्त
मी.
जगती यशाचे गोडवे
मग अंतरी का पस्त मी?
मजवीण ना दूजा रिपू
घालू कुठेशी गस्त मी.
- श्रीधर जहागिरदार
१५ जुलाई २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा