शनिवार, १२ एप्रिल, २०१४

तहान

 
 
वाळवंटात खूप मागे राहिलेला
एक म्हातारा सुरकुतलेला ....

उमेदीत खणलेल्या
त्याने जिवंत विहिरी,
आणि रचलेले
उत्तुंग गिरी ....

आताशा तहानला 

कि टिपतो
कड़ा ओलावलेल्या
आणि जपतो
सावल्या सांजभावल्या
मध्यान्हीच्या एकांत सूर्याला रिझवण्यासाठी

मृगजळ उमगायला 

आयुष्य थिट पड़ाव ना ?

- श्रीधर जहागिरदार 
१२-०४-२०१४ 

1 टिप्पणी:

  1. म्हणूनच की काय शेवटी गंगा पाजली जाते, मृगजळापाठी जन्मभर वणवणलेल्या थकल्या जीवला शेवटी तेवढाच एक पाण्याचा घोट

    उत्तर द्याहटवा