शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

अटक मटक ..(RAP )

अटक मटक....   (RAP )


आळोखे पिळोखे, चालती सारखे    
मनाला बसले, घट्ट हे  विळखे ..
--------------------------------

पोटात आग, डोळ्यात जाग,
आयुष्याची  भागमभाग ...

जीवतोड, मोडतोड,  
नशिबाची खाडाखोड  ... 

उसने गाणे, खोटे नाणे,
फुसके टरफल कुजके दाणे,  ....

धुसफूस, बदल कूस 
शृंगाराची नासधूस ... 

झाड-वारे, अंगारे धुपारे, , 
पदवीला त्या आग लाव रे  ...    

उलट सुलट, वार पलट,
जिंकण्याची खटपट खटपट .....  

लाज शरम, भलते भ्रम, 
झाकण्याचे नकोत श्रम ... 

भलते सलते, कुणा न सलते,
बघून बघून  सवय जडते ...
-----------------------------

अटक मटक, इथून सटक
जगण्याची लागेल चटक ...


- श्रीधर जहागिरदार
१६-१२-२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा