बोलतो आपण अता, पण तरी ना बोलतो,
बोलण्या आधीच कां, शब्द सारे तोलतो?
ते दिवस होते असे, गंध केवळ माळला,
माळण्या आधी अता पाकळ्या कां मोजतो?
नम्रता,हास्य, सुवदन, आभूषणे मानली
काय होते येत सत्ता, कोण त्यांना लाटतो?
वागण्याचे स्वातंत्र्य दोघांसही भावले
हासण्याचेही खुलासे कां अता मागतो?
मान्य आहें येथ सारे व्यवस्थित वाटते,
विस्थापिता सारखा कां तरी "श्री" वागतो?
- श्रीधर जहागिरदार
१-९-२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा