रविवार, २५ मार्च, २०१२

म्हणावे कशाला...मन व्यक्त पाहीजे, म्हणावे कशाला...
मग वृत्त जाणीजे, म्हणावे कशाला...

जर आस ठेवीतो प्रभू दर्शनाची,
मज भक्त पाहीजे, म्हणावे कशाला...

भर पेट मलीदा तरी हाव बाकी
मन शांत पाहीजे, म्हणावे कशाला...

पर छाटले रुढींनी, मन जायबंदी,
खग मुक्त पाहीजे, म्हणावे कशाला... 

मज भावली चित्तातली फकीरी
मग तख्त पाहीजे म्हणावे कशाला...
- श्रीधर जहागिरदार
२३.०३.२०१२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा