मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

लिहावयाचे तरी न लिहिते (अनुवाद)


लिहावयाचे तरी न लिहिते
*************************
ते ते जे जे आहे दडवून
कसे लिहावे कविते मधुनी
लिहावयाचे तरी न लिहिते
बसले आहे  ओठ शिवुनी…

न लिहिलेल्या कवितेमध्ये
दरवळणारा वसंत नाही
ना प्रीतीचा कुठे दिलासा
देश,धर्म ना देती ग्वाही …

अथांग आहे कोरड रेती
निवडुंगाचे सलते काटे
न लिहिलेल्या कवितेमध्ये
सारे अवघड… मनात दाटे …
बरेच काही आणिक आहे
ओंगळवाणे…  नाही लिहिवत,
साबणवाल्या जाहिरातीच्या
खालील कचरा नाही बघवत
 धर्मही असतो कुठलासा जो
चार दिसाला महिन्याकाठी
वाळीत टाकी बायापोरी
कधी कधी तर नेहमीसाठी


नात्यामधल्या पुरुषांचे ते
तिखट बोलणे कुत्सित हसणे
आई माझी ऐकत असते
कामे उरकीत निमुटपणाने …
कारण माझा बाबा असतो
दुसऱ्या गावी, कामासाठी
वणवण त्याची, ठेवून मागे
दैना आमची आमच्यासाठी


असेच असते काहीबाही
न लिहिलेल्या कवितेमध्ये
कशी खोलवर ठसठस उरते
न लिहिलेल्या कवितेमध्ये

अनुवाद : श्रीधर जहागिरदार


मूळ कविता : आभा निवसरकर मोंढे

एक नहीं लिखी जा रही कविता में
वो सब है जो मैं लिखना चाहती हूं
नहीं लिखी जा रही कविता में
कोई वसंत नहीं
कोई प्रेम नहीं,
देश नहीं, धर्म भी नहीं
बालू है, गिट्टी है
गिरने पर लगने वाले और हाथ पैर में घुस जाने वाले नुकीले पत्थर हैं,
जो नहीं लिखे जा रहे
और भी है घिनौना सा कुछ
लक्स साबुन के विज्ञापन के नीचे कचरे के ढेर सा
और..
और एक धर्म है जो लड़कियों को जात बाहर कर देता है कुछ दिनों के लिए
और कभी कभी हमेशा के लिए
आदमियों के ताने हैं
आदमी जो मेरे अपने सगे रिश्तेदार हैं
जो मेरी अपनी सगी मां को बुरा बुरा कहते रहते हैं
क्योंकि पिता कहीं हैं काम पे
पिता नहीं ले जाना चाहते अपना परिवार
अपनी जिल्लत अकेले ही भोगना चाहते हैं
और हमें छोड़ देते हैं हमारी जिल्लत पर
ये
और भी बहुत कुछ
एक नहीं लिखी जा रही कविता का
अंश है..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा