बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

बाळकृष्ण

त्याने उघडले फ्रिजचे दार सताड फिरवली नजर आतल्या ब्रम्हांडावर उचलला नेमका एक डबा लावले दार अलगद, आवाज होणार नाही याची दक्षता पाळत ! वळला आणि सुसाट पळाला डायनिंग टेबलाच्या खाली बसला डबा उघडून, डोळे बंद करुन समाधी लावून ... काय चाललंय? नानूने विचारले मी बेरी खातोय , सांगू नको ममाला डोळे न उघडता तो म्हणाला रोज संध्याकाळी नानीच्या मांडीत "हा बालकुष्ण आहे ना" विचारून निमुटपणे बसतो, हात जोडून, शिकवणीला बसल्या सारखा.. id="marblogwidget_1_6708" class="widget">

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा