रविवार, १४ मार्च, २०१०

भंग अभंगमना लागले अंधाराचे खूळ,
व्यथेची चूळ, मुखी असे।

अस्तित्व स्वत:चे दावी वाकुली,
जीर्ण सावली, फक्त हसे।

गळून पड़ती पिकल्या आशा,
पालवे निराशा, निष्पर्णातुन।

सबल तनी वसे खुजावले मन,
जगतो जीवन, मी मरणातुन।

२ टिप्पण्या: