मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

कळ 'अन डू ' ची अनुवाद)



शाळे बाहेर
बसणाऱ्या
आजीच्या त्या
टोपलीतल्या
गाभूळ चिंचा
आणिक बोरे
पळवून नेली
होती कितीदा
.
टाटपट्टीची
सुतळी मोकळी
बांधून ठेऊन
समोरच्याच्या
ढगळ चड्डीला
शाळा सुटता
मजा घेतली
हसून कितीदा
.

बाल सभेतून
शिकून झाली
लक्षण गीते
रागदारीची
तरी  प्रार्थना
आणि पाढे
तार स्वरातून
म्हणावयाची
गंमत न्यारी
वाटे कितीदा
.
खेळत असता
टोलवलेली
विटी उडोनी
जाईल वाटे
गगन भेदुनी
परि एकदा
सरळ पोचली
कशी कळेना
पीटी सरांच्या
उघड्या शिरी
यम अवतरला
वाटून गेले
असे कितीदा
.
ठाऊक नव्हते
बालपणीचे
सवंगडी ते
दिशादिशांना
असे पांगतील
मनात येते
कळ जादूची
कधी गवसावी
संगणकावर
जशी 'अन डू ' ची
पुसली जावी
मधली वर्षे अन
पडद्यावर
उमटून यावे
तेच बालपण
पुन्हा एकदा !!



मूळ कविता : विवेक मृदुल
स्वैर अनुवाद : श्रीधर जहागिरदार

मूळ कविता

चाहिए 'अन डू ' ऑप्शन
.
बुआ के उबले चटपटे चने
और लेते मीठे कबीटों का स्वाद
उम्र कब बढ़ती गई
नहीं आता याद
टाट पट्टी स्कूलों के
बेवजह खुश रहनेवाले हम
पढ़ते-गाते बाल सभाओं में
लक्षण - गीत सरगम
प्रार्थना मगर चीख-चीखकर ही
गाने का था नियम
पीटीवाले मास्साब हमेशा
लगते थे यम
हम गिल्ली उछालते थे ऐसे
मानो चीर देंगे आसमान
पता न था इतने अलग होंगे
हमजोलियों के मुकाम
जीवन में एक बार जो मिले
'अनडू' ऑप्शन
तो दौड़कर वापस ले आऊँ
फिर से गुजरा बचपन
.
(विवेक मृदुल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा