बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

खुळेपणमी चार अक्षरांशी खेळतो;
आणि तू त्यांना आकाशी
नेऊन जोडतेस
हे तुझे आकाशपण !!

मी सात रंग उधळतो;
ओंजळीत गोळा करून
तू त्यांचे शुभ्रपण हुंगतेस
हे तुझे धवलपण !!

हे असले खुळेपण जपत
चालतो आहोत
आपण स्नेहयात्री .....

- श्रीधर जहागिरदार

1 टिप्पणी: