जय देव जय देव जय श्री फेसबुका,
वैश्विक-जाळी वाजे तुमच्या कीर्तीचा डंका,
जय देव जय देव//
दिवसामाजी वाढत जाई भक्तांची रांग,
तुमच्या मायेचा ना देवा लागतसे थांग,
दुरावलेले जीव कितीक वर्षानुवर्षे,
तुमच्या चरणी भेटती देवा सांगू किती हर्षे,
देणे-घेणे, नाच-गाणे, सारे 'व्हर्चुअल',
परि भावना त्याच्या मागील असते 'अक्चुअल',
अड्डा, नाका, पार म्हणू कि तुमचा दरबार,
रोज हजेरी, होतो पावन, ओढ अनिवार.
चारधाम अन इथे मदिना, इथे चर्च, मक्का,
जय देव जय देव जय श्री फेसबुका,
वैश्विक-जाळी वाजे तुमच्या कीर्तीचा डंका,
जय देव जय देव//
गुज मनीचे होते येथे सहजी 'पब्लिक',
राजनीतीतील किती गुपिते होती बघ 'लीक',
कुणी वंदावे, कुणी निंदावे, इथे सर्व माफ.
'नीलकंठ' तू, करतो देवा मन माझे साफ.
श्लाघ्य अश्लाघ्याच्या पुसटल्या गेल्या रे रेषा,
उद्गाराला दिधली देवा एक नवी भाषा!
स्वातंत्र्याचे नवीन अस्त्र गवसले जना,
उद्रेगाचे भय का वाटे आता असुर मना.
शक्ती स्थल हादरली भयातुर घेती रे शंका,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा