दरवेळी असेच होत आले !
त्याने तिला। एकदाच । एका कोपऱ्यात । तिच्या मनाविरुद्ध । कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना । वासनेच्या अंधार क्षणी वगैरे … मारून टाकले मनानिशी !
त्याने तिला। एकदाच । एका कोपऱ्यात । तिच्या मनाविरुद्ध । कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना । वासनेच्या अंधार क्षणी वगैरे … मारून टाकले मनानिशी !
न्याय मिळवण्यासाठी ह्या हत्येचे, त्यांना हवे तसे ...
प्रश्नांची नखे रुतवत, मनातल्या मनात
जगावी लागली तिला ओंगळ सात मिनिटे
मनाविरुद्ध । पुन्हा पुन्हा …। कायदेशीर ठिकाणी . …. । कायदेतज्ञांच्या अखात्यारात। न्याय मिळेल ह्या आशेच्या अंधुक क्षणी ….
घराघरातल्या दिवाणखान्यातून
प्रकाश करून टीवीच्या पडद्यावर
कायद्याचे राज्य पुनर्स्थापित व्हावे ह्यासाठी …
पेटत्या मेणबत्त्या सांगू लागल्या तिला
सोड बाहूलीपण, हो ज्वाला
सबल हो सबल हो स्वबलाने लढ लढा
पुन्हा पुन्हा अस्तित्वावरच आघात करणारे
आणि सरळ ठेवले नेऊन हातात तिच्या धाडसाविरोधात !!
*
पौरुष गमावलेल्या नराने
हिरव्याकंच झाडाला लटकून
आत्महत्या केल्याची बातमी
जाहिरातींच्या चार पानानंतर
तिसऱ्या पानावरच्या तिसऱ्या रकान्यातली
वाचलीत का तुम्ही?)
- श्रीधर जहागिरदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा