आपले चंद्र सूर्य वसवायला, तू माझे आकाश नेलेस
मला राग नाही;
स्वप्न फुलांची आरास सजवायला, माझी रात्रही नेलीस,
तरी मला जाग नाही.
कधी दंवात नहायला, पहाट देखील तू पळवलीस,
तरी कपाळी आठी नाही;
फुले आपली भारायला, गंध सारा शोषून नेलास,
तरी आडकाठी नाही.
कुणी कधी मागू नये असं जेव्हां मागू लागलीस,
तेव्हां नजर वर झाली,
हा तर माझा हक्क आहे, असं बजावून,
सारे काही लुटून गेलीस!
जाणीव जागी झाली जेव्हां,
डोळ्यात अर्थांचे कवडसे शोधले,
मग त्याच वेळी नेमके,तुझ्या
डोळ्यात अवसेचे आकाश कां दाटले?
मला राग नाही;
स्वप्न फुलांची आरास सजवायला, माझी रात्रही नेलीस,
तरी मला जाग नाही.
कधी दंवात नहायला, पहाट देखील तू पळवलीस,
तरी कपाळी आठी नाही;
फुले आपली भारायला, गंध सारा शोषून नेलास,
तरी आडकाठी नाही.
कुणी कधी मागू नये असं जेव्हां मागू लागलीस,
तेव्हां नजर वर झाली,
हा तर माझा हक्क आहे, असं बजावून,
सारे काही लुटून गेलीस!
जाणीव जागी झाली जेव्हां,
डोळ्यात अर्थांचे कवडसे शोधले,
मग त्याच वेळी नेमके,तुझ्या
डोळ्यात अवसेचे आकाश कां दाटले?