शनिवार, १२ जानेवारी, २०१३

रंगमंच




माझा मुखवटा लढतोय
एका स्वतंत्र अस्तित्वासाठी ...


थकलाय तो,
चेहऱ्याचा पाखंडीपणा लपवून लपवून ..
जाणतो तो,
प्रकाश-वंचित चेहरा होतोय
हळूहळू विदीर्ण, विरूप....
बघतोय तो वाट चेहऱ्याच्या
संपूर्ण विरून जाण्याची;
आपल्या जिवंत होण्याच्या क्षणाची....


पण असणार असेल तो क्षणही
एका कोवळ्या मुखवट्याच्या जन्माचा,
कारण प्रत्येक विरत जाणारा चेहरा
पेरत असतो एक बीज नव्याच मुखवट्याचे !!
*

मुखवट्या विना शिरू शकत नाही
कधीच भूमिकेत चेहरा कुठलाही !


हाच आहे ह्या रंगमंचाचा नियम !!



- श्रीधरजहागिरदार
१३-०१-२०१२




1 टिप्पणी:

  1. आवडली आहे.

    प्रत्येक विरत जाणारा चेहरा
    पेरत असतो एक बीज नव्याच मुखवट्याचे !!..

    हे खास.

    उत्तर द्याहटवा