खोडले, लिहिले पुन्हा,
ना तरी जमले पुन्हा ...
घाव ते उघडू नको
कावळे टपले पुन्हा...
दु:ख जे जपले उरी
तेच कां लुटले पुन्हा?
ध्वस्त ना झाली मने
बांधती इमले पुन्हा ...
चोचले पुरवून ही
मातले अपुले पुन्हा...
भेटलो असतो शिवा,
मोह ते अडले पुन्हा...
पावसा कर तृप्त तू
मी धरा, नटले पुन्हा...
भोगतो चुपचाप 'श्री',
चालती खटले पुन्हा...
- श्रीधर जहागिरदार
२५.०५.२०१२
भोगतो चुपचाप 'श्री',
उत्तर द्याहटवाचालले खटले पुन्हा...
mastach.
apalyaa navasakat ithe takali aahe. harkat kalvaavi
http://marathikavitaa.wordpress.com/2012/06/05/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/