कविता - एक शब्दखेळ
मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६
ही कुणाची याद आहे
ही कुणाची याद आहे
*******************
फक्त इतका वाद आहे
घोष की उन्माद आहे
वाहत्या पाण्यात चित्रे
काढण्याचा नाद आहे
लागले भांड्यास भांडे
तो म्हणे संवाद आहे
फुंकरीने झोम्बणारी
ही कुणाची याद आहे
ठेवतो विश्वास भोळा
हा खरा बर्बाद आहे
नांव नाही, PAN नाही
"श्री" तरी आबाद आहे
- श्रीधर जहागिरदार
२०-११-२०१६
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)