रविवार, १८ सप्टेंबर, २०११

मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा


डोक्यावर दिसू लागते टक्कल, त्याला सलाम,
सुटतेसे वाटते पोट, त्याला सलाम,

वाढत्या वयात येणाऱ्या शहाणपणाला सलाम,
करायच्या राहून गेलेल्या मूर्खपणाला सलाम,

अंगावर जाणून बुजून चढवलेल्या रंगीबेरंगी शर्टला सलाम
त्यामुळे मनात दरवळणाऱ्या हिरवळीला सलाम.

मनाला येणाऱ्या सैलपणाला सलाम.
आसपासच्या सौंदर्याचा वेध घेणाऱ्या डोळ्यांना सलाम.

तुमच्या वेडेपणाला आजवर खपवून घेणाऱ्या
प्रेमळ सहचारिणीला सलाम.

सलाम, सलाम, सलाम,
तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला सलाम,
तुमच्या आमच्या मैत्रीला सलाम!

२ टिप्पण्या: