मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
बाळकृष्ण
त्याने उघडले फ्रिजचे दार सताड
फिरवली नजर आतल्या ब्रम्हांडावर
उचलला नेमका एक डबा
लावले दार अलगद, आवाज होणार नाही
याची दक्षता पाळत !
वळला आणि सुसाट पळाला
डायनिंग टेबलाच्या खाली बसला
डबा उघडून, डोळे बंद करुन
समाधी लावून ...
काय चाललंय? नानूने विचारले
मी बेरी खातोय , सांगू नको ममाला
डोळे न उघडता तो म्हणाला
रोज संध्याकाळी नानीच्या मांडीत
"हा बालकुष्ण आहे ना" विचारून
निमुटपणे बसतो, हात जोडून,
शिकवणीला बसल्या सारखा..
रविवार, ३० जुलै, २०२३
भिंग
मान्य!
तुम्ही माझे सुहृद आहात ,
हितचिंतक आहात,
मनापासून कळवळा आहे माझ्या बद्दल
तुमच्या मनात…
नक्कीच तुमचा शब्द माझ्या भल्यासाठी योजता तुम्ही.
पण तरी,
हे सारं होत असताना
एकांत हवाच असतो मला माझा
स्वत:च स्वत:ला तपासायला,
तुमची तपासणी
तुमच्या भिंगातून
कधी मलाही सवड द्या
माझे भिंग तपासायला !!
- श्रीधर जहागिरदार
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)