रंगण्या रंगात साऱ्या मोकळा तू हो मना
तेच तुला रंगतील भावतोस ज्यांच्या मना …
तेच तुला रंगतील भावतोस ज्यांच्या मना …
आणले कोणी दिलासे गर्द हिरवे जाण रे
घे जरा उधळून त्यांना टवटवेल प्राण रे...
घे जरा उधळून त्यांना टवटवेल प्राण रे...
पांघरून घे जरा तो निळा घन सावळा
हुंगून घे अथांगता, श्वास होइल मोकळा ...
हुंगून घे अथांगता, श्वास होइल मोकळा ...
कोरडा फिरशील तू आजच्या दिवशी असा
होऊनी खजिल खचित तोंड फिरविल आरसा
होऊनी खजिल खचित तोंड फिरविल आरसा
- - श्रीधर जहागिरदार