सैरभैर
*******
पानगळीला सुरुवात झाली
कि मन सैरभैर व्हाव पानगळीला सुरुवात झाली
दडपण असायचं,
पायरी पायरीवर द्याव्या लागणाऱ्या.
अवघ्या अस्तित्वाला भेदून जाणाऱ्या
एकेक प्रश्नाचं ...
आयुष्यातली अवघड गणितं सोडवून घ्यायला
येत असे मग तुझ्याकडे.
नव्या पालवीने आलेला आत्मविश्वास
मग पुरायचा पुढील तीन ऋतू ……
..
अचानक वाटा बदलल्या
अंतर वाढलं
आणि उत्तरंही ..
तुझं मला सांगणं :
पालवी भेटेलच
याची खात्री नाही आता !!"
- श्रीधर जहागिरदार
१३ फेब्रु २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा