लग्नाआधी दोघेही हातात हात घालून
मोकळ्या आकाशाखाली मुक्त हिंडायचे …
मोकळ्या आकाशाखाली मुक्त हिंडायचे …
ती ह्याच्या डोळ्यांनी, तो तिच्या डोळ्यांनी
एकच आकाश बघत रंगायचे …
मग दोघांनी ठरवलं
असच किती दिवस फिरायचं ?
वाट बघत बघत तासन तास झुरायचं ?
त्या पेक्षा रहाव, दोघांनी सोबत कायमच…
आकाश मोकळ दिलं सोडून
आणि घेतलं आपल्याला बांधून !
आता ते राहतात कायमचे
एका घरात …
बघत बसतात
आपल्या मनात उगवलेल्या
नव्याच भिंतीच्या खिडकीतून
नव्याच भिंतीच्या खिडकीतून
आकाशाचा आपापला तुकडा !
- श्रीधर जहागिरदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा