गोंधळाला पार आहे
तूच तो आधार आहे ….
थंडशी झाली विधाने
तूच तो आधार आहे ….
आरसा घेऊन आलो
त्यांत कां तक्रार आहे? …. थंडशी झाली विधाने
पोळले जिव्हार आहे …
घेतली लाठी निघाले
मारण्या जो ठार आहे …
पत्थराचा देव होता
घेतला कैवार आहे …
कौतुकाचे ताट मांडा
'श्री' अधाशी फार आहे …
श्रीधर जहागिरदार
१० आगस्ट २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा