जिद्द
जंगल कापली जाताहेत
त्याच्या दशपटींनीत्याच वेळी उगवताहेत
शीळ हरवलेली पांखरे
कावरी बावरी फडफडताहेत
निलाजऱ्या गिधाडांच्या छायेत
सूर्याचा शोध त्यांचा
वाटतोय संपुष्टात आलेला….
अवखळपणा विसरून
वाहते झरे स्तब्ध झालेत,
अवखळपणा विसरून
वाहते झरे स्तब्ध झालेत,
कोरड्या पडलेल्या तळाशी
साचू लागलाय फक्त गाळ,
वातावरणातला ….
तरी लक्ष वेधून घेतो
वातावरणातला ….
तरी लक्ष वेधून घेतो
कातळातून डोकावणारा
एक तृणांकुर,
जिद्दीने श्वास घेऊ पाहणारा ….