तुही असायला हवी होतीस खरंतर,
पण सापडल्या नसतील तुला
पुसल्या गेल्या कालच्या पाउल खुणा..दोष तुझा नाही ह्या सळसळत्या लाटांचा
सारे काही पुसुनसुध्दा, आयुष्य तर
सुरु आहे म्हणत, मिरवणार् या.....
मी मात्र खड़क झालोय,
कणाकणान तुटणारा.
पायथ्याशी
त्या संध्याकाळचे सारे रंग एकवटून
काही शिंपले आणि एक गजरा
कुणा मानिनीच्या केसातून गळलेला......
कधीतरी तर येशीलच तू
पुसल्या गेल्या पाउलखुणांचे भान विसरून
नव्या पाउलखुणा उमटवत,
तेंव्हा
एक नवाच खड़क आढलेल तुला
लाटांच्या आवेगाने क्लांत झालेल्या तुझ्या
देहाला आसरा देण्यासाठी, तेवढाच
आतुर अन तसाच समंजस!