नेमका मी आहे कुठे?
मी प्रवाही झालो कुठे !
सोडल्या मी वाटा जुन्या
पण नव्याने जाऊ कुठे?
पाखरांचा उडला थवा
झाड गाते शोधू कुठे?
दु:ख गेले हरखून.. मी
आसवांना वळवू कुठे?
धाक ठेवी, शिस्तीत जी
ती मुठीची काठी कुठे?
आठवावी आई मला
शोधताना लाडू कुठे !
सांगणारा नाही कुठे !
- श्रीधर जहागिरदार
२६ जुलै २०१८