चंद्राचा जात होता,
 काल थोडा तोल
भरती होती आलेली, 
निशेचा होता कौल...
फेरा पूर्ण पुनः
नव्या परिघावर ठेवणार आता
नव्या परिघावर ठेवणार आता
कुठल्या ती खुणा?
आज आहे सूर्य 
जादाच आळसावलेला,
ढगा-धुक्याची दुलई पांघरून
मजेत सुखावलेला..
बघता बघता आता 
वारा धरेल वेग,
सुस्तावलेल्या  जगास मिळेल 
एक नवा संवेग...   
भोवऱ्यात त्या शिरण्याआधी 
ठेवा स्थिर मना,
सफल हो प्रवास तुमचा, 
'श्री'च्या शुभकामना !
- श्रीधर जहागिरदार
१ जानेवारी